Vidhan Parishad Election 2026 : शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या 17 उमेदवारांची नावे जाहीर; वाचा संपूर्ण यादी, एका क्लिकवर
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटप आणि सर्व १७ उमेदवारांची अंतिम यादी अखेर समोर आली आहे.

Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यांनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 17 जागांवर एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
भाजपने आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावेही निश्चित झाली आहेत. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Vidhan Parishad Election 2026)
भाजपच्या 11 उमेदवारांची यादी
- वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
- अमरावती- प्रवीण पोटे
- सोलापूर- राजेंद्र राऊत
- सांगली सातारा- धैर्यशील कदम
- अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
- नांदेड – अमर राजूरकर
- धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
- जळगाव- नंदकिशोर महाजन
- नागपूर- राजीव पोतदार
शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी
- ठाणे- रवींद्र फाटक
- नाशिक- नरेंद्र दराडे
- परभणी-हिंगोली- सईद खान
- यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
- पुणे- विक्रम काकडे
कोणत्या जागांवर निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. (Vidhan Parishad Election 2026)
महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्याने आता सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज, संभाव्य बंडखोरी आणि 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. विशेषतः प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर मिळालेली उमेदवारी, तसेच पुण्यात विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेली नाराजी ही या निवडणुकीतील चर्चेची प्रमुख केंद्रे ठरत आहेत. (Vidhan Parishad Election 2026)
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून
आधीचे आमदार कोण?
- सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
- अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
- ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
- जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
- सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
- नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
- यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
- पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
- भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
- नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
- अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
- धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
- परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
- छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
- नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)





