Vidhan Parishad Election 2026 : राष्ट्रवादीत मोठा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच बड्या नेत्याचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
Vidhan Parishad Election 2026 : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Vidhan Parishad Election 2026)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असताना पुण्याची बहुचर्चित जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. मात्र उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Vidhan Parishad Election 2026)
अनेक दिग्गज इच्छुक, पण उमेदवारी विक्रम काकडेंना
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेसाठी अनेक वरिष्ठ नेते आणि माजी आमदार प्रयत्नशील होते. उमेदवारीसाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांची नावे चर्चेत होती. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर हे देखील इच्छुक मानले जात होते. (Vidhan Parishad Election 2026)
मात्र पक्षाने अपेक्षेपेक्षा वेगळा निर्णय घेत विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली. (Vidhan Parishad Election 2026)
राजीनामा पत्रातून तीव्र नाराजी
रामदास गाडे यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पक्ष वाढवण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. तसेच, पूर्वी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Vidhan Parishad Election 2026)
राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी उघड
विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत खदखद आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा राजीनामा पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात असून आगामी काळात आणखी काही नेते किंवा पदाधिकारी नाराजी व्यक्त करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Election 2026)





