Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी हालचाली सुरू; राष्ट्रवादीकडून ६ नेत्यांच्या नावाची चर्चा
Vidhan Parishad Election 2026 : उमेदवाराची निवड करणे ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी राजकीय कसोटी ठरणार

Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेतील ९ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे.
यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने आपल्या वाट्याला येणाऱ्या ६ जागांसाठी तब्बल ३० संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. या निवडणुकीत माजी आमदार प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील एका जागेसाठी कुणाला संधी द्यायची यासाठी चर्चा सुरू आहेत.
६ जणांची नावं चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी ६ जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत आहेत. तसंच अमोल मिटकरी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी राजकीय कसोटी ठरणार आहे. एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून अनेक नेते इच्छुक आहेत. त्यामुळे आता एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे.
एकूण 9 जणांचा कार्यकाळ संपणार
उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. Vidhan Parishad Election 2026
हेही वाचा:
Cocktail 2: ‘कॉकटेल 2’मध्ये ‘वेरोनिका’ परतणार? दीपिका पादुकोणच्या कॅमिओच्या चर्चांमागचं खरं काय!






