Sanjay Raut : “राष्ट्रवादी नेत्यांचे भाजपच्या सुचनेनुसार काम” – संजय राऊत
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने अंतर्गत मतभेदांच्या वृत्तांचे खंडन करत, ही एक नियमित बैठक असल्याचे म्हटले. विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाजपच्या सूचनेनुसार काम करत आहेत आणि अखेरीस ते भाजपमध्येच सामील होतील, असा आरोप ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी केला.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष आता दिवंगत अजित पवार यांचा राहिलेला नाही. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याचे संस्थापक शरद पवार यांचाच आहे. रविवारी रात्री दिल्लीत झालेल्या एका बैठकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे विधान केले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या बैठकीमुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले, कारण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ व जय पवार हे उपस्थित नव्हते.
मात्र, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने अंतर्गत मतभेदांच्या वृत्तांचे खंडन करत, ही एक नियमित बैठक असल्याचे म्हटले. विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.






