#VIDEO: भाजपा खासदारांचे अजब वक्तव्य; म्हणाले,“गुटखा खा, दारू प्या, नाही तर…”

नवी दिल्ली : भाजपचे नेते रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. दरम्यान. आता मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्धन मिश्रा यांनी हे देखील त्यांच्या एका अजब वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले आहेत. मिश्रा यांनी “जमिनीतील पाणी आटत चाललं आहे. त्यामुळे पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा… पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या”, असे वक्तव्य रेवामध्ये जल संवर्धनाच्या शिबिरात केले आहे.
रेवामधील क्रिष्णराज कपूर सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील जनार्धन मिश्रा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते पाणी वाचवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
#WATCH | Rewa, Madhya Pradesh: "Lands are running dry of water, it must be saved… Drink alcohol, chew tobacco, smoke weed or smell thinner and solution but understand the importance of water," says BJP MP Janardan Mishra during a water conservation workshop pic.twitter.com/Nk878A9Jgc
— ANI (@ANI) November 7, 2022
“पाण्याव्यतिरिक्त कुठल्याही कराची माफी द्या. मात्र, पाणीपट्टी आम्ही भरू, असं एखाद्या सरकारनं पाणीपट्टी माफीची घोषणा केल्यावर सांगा”, असे आवाहनही या शिबिरात मिश्रा यांनी केलं आहे.
“दरवर्षी पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याचा वापर वाढत असताना हे होणारच आहे. जेव्हा पैसा खर्च केला जाणार, तेव्हाच पाणी वाचवलं जाईल”, असेही मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रा यांनी याआधीही बऱ्याच वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेतला आहे. हातांनी शौचालयाची साफसफाई करतानाचा त्यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता.




