Video : शशिकांत शिंदे यांचे बंधू शिवसेनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Updated On:

पाचगणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक काम करताना राजकीय सारीपाटावर माझा व माझ्या कुटुबांतील सदस्यांचा दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी पराभव केला.

तर विरोधात काम करणाऱ्यांविरोधात पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही, असे माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांनी दै. प्रभातला सांगितले. यापुढील राजकीय प्रवास शिवसेनेसोबत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. असून घाम गाळणाऱ्या माथाडी कामगारांच्या प्रमुख मागण्या सरकारकडून सोडवण्याचा यापुढे प्रयत्न राहणार अहे, अशी माहीती त्यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे मोठे बंधू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश राजकीय भूकंप मानला जात आहे. ऋषीभाई शिदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी माथाडी कामगारांमध्ये आपली ताकद वाढवली असून,

त्याचा राजकीय फायदा नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्वपूर्ण मानला जात आहे. माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांनी केलेल्या राजकीय भूकंपानंतर जावळ तालुक्‍यात देखील प्रतिक्रिया उमटल्या असून जावळीत माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेतील प्रवेशाचा फायदा कोणाला होणार ते काळच ठरवेल हे मात्र निश्‍चित.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता