Nagar: कोपरगावच्या २ . २१ कोटी निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत लेखाशिर्ष (२२१७ ए ३३२) अंतर्गत सन २०२४-२५ मधून २ कोटी २१ लाख रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
या निधीतून कोपरगाव नगरपरिषद हद्दवाढ भागातील कर्मवीर नगरमधील गुजराथी घर ते अग्रवाल घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (८.५६) लाख, प्रभाग क्र.१ मध्ये आर. जे. भागवत घर ते ज्ञानेश्वर घर ते मोबीन घर खड़की रोड रस्ता काँक्रिटीकरण करणे (२६.६९) लाख, राजू काळे घर ते ३ लक्ष्मीआई मंदिर परिसर भूमिगत गटार बांधकाम करणे (२४.७२) लाख, लांडगे घर ते खडकी रोड परिसर भूमिगत गटार करणे (४.९०) लाख, अनिल कुदळे घर ते राजु काळे घर भूमिगत गटार करणे (९.९४) लाख, समतानगर भागात अनिल गाडे घर ते पारधी घर गटार बांधकाम करणे व अंतर्गत रोड क्रॉसिंग करणे (४.९९) लाख, आकार रेसिडन्सी ते जानवी किराणा स्टोअर्स भूमिगत गटार करणे (२२.८९) लाख,
साईलक्ष्मीनगर ते खडकी रस्ता खडीकरण करणे (१०.१६) लाख, रज्जाक भाई घर ते मोबीन खान घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे (८.५०) लाख, प्रभाग क्र.२ मध्ये सादिक शेख घर ते पगारे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (७. ५९) लाख, प्रभाग क्र.६ मध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील एस.जी. विदयालयासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे (००.८५) लाख, प्रभाग क्र. ८ मध्ये भगवती कॉलनी मधील दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर पेव्हींग ब्लॉक बसविणे (४०.०३ लाख), प्रभाग क्र.१० मध्ये राजु लोखंडे घर ते ठोंबरे घर भूमिगत गटार करणे (९. ९०) लाख, जिल्हा परिषद विश्रामगृह परिसर वायखिंडे घर ते संदीप मेढे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार करणे (१६. ३३) लाख,
प्रभाग क्र. ६ मध्ये नगरपरिषद इमारतीच्या बाजूने सोलिंग व कॉक्रीट करणे (९. ९९) लाख, प्रभाग क्र.९ मध्ये सुपेकर घर ते भारती घर व प्रभाग क्र.२ मध्ये पटेल घर ते येवला रस्ता गटार बांधकाम करणे (४.९८) लाख, कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील मालकीचे माधव बागेत कारंजाचे बांधकाम व इतर अनुषंगीक कामे करणे (९.९९) लाख इत्यादी कामांचा समावेश आहे.लवकरच या कामांच्या निविदा प्रसिद्ध होवून कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे.





