Video : प्रेम वेडा.! प्रेयसीला सूटकेसमध्ये घालून हॉस्टेलमध्ये नेण्याचं ‘लव्ह मिशन’ फसलं, सूटकेसप्रेम झालं व्हायरल

OP Jindal University : हरियाणातील सोनीपत येथील ओ.पी. जिंदाल विद्यापीठात एका विद्यार्थ्याने बॉलीवूडपटाच्या कथानकाला लाजवेल अशी धक्कादायक गोष्ट केली आहे. प्रेमात असलेल्या या तरुणाने चक्क आपल्या प्रेयसीला गुपचूप हॉस्टेलमध्ये घुसवण्यासाठी तिला सूटकेसमध्ये लपवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, ही घटना हॉस्टेलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि जेव्हा या सुटकेसमधून मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर आला तेव्हा सुरक्षा रक्षकांनी संशयास्पद सूटकेस तपासली. तेव्हा त्यातून एक तरुणी बाहेर आली आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
मात्र, तेथील एका विद्यार्थ्याने ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडला आहे.
A boy tried sneaking his girlfriend into a boy’s hostel in a suitcase.
Gets caught.
Location: OP Jindal University pic.twitter.com/Iyo6UPopfg
— Squint Neon (@TheSquind) April 12, 2025
तुम्ही पाहू शकता, या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक सुटकेस उघडताना दिसत आहेत तर एक मुलगी त्यात अडकली आहे. आणि सगळीकडे एकच आरडाओरडा होत आहे. आजूबाजूला विद्यार्थी देखील दिसत आहेत.
दरम्यान, या मुलीची ओळख पटलेली नाही आणि ती त्याच विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे की बाहेरून आली आहे? हे देखील स्पष्ट झाले नाही. तसेच या घटनेबद्दल विद्यापीठाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
व्हिडिओमुळे वसतिगृहाच्या सुरक्षेवर आणि परिस्थिती कशी हाताळली गेली याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित विद्यार्थिनी किंवा मुलीवर कोणतीही कारवाई करण्यात आली आहे की नाही हे विद्यापीठाने सार्वजनिक केलेले नाही.





