VIDEO: ‘मला लय आवडतात…’; भरत जाधवांची भेट घेऊन सुरज चव्हाण भारावला

Suraj Chavan Meet Bharat Jadhav | ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण विजेता ठरला. या शोनंतर आता सुरजचा ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी सूरजची भरत जाधव यांची भेट घेतली. सध्या दोघांच्याही या ग्रेट भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सूरजने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “भरत जाधव सर मला लय आवडतात. त्यांचे चित्रपट बघून खूप हसायला येतं. काल त्यांची भेट झाली. सर खूप खूप भारी आहेत. त्यांनी मला आपल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप प्रेमाने वेळ दिला. भरत सर खूप खूप आभार, भावांनो आज मी खूप खुश हाय, सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या ‘झापुक झुपूक’ गोलीगत शुभेच्छा…” Suraj Chavan Meet Bharat Jadhav |
View this post on Instagram
सुरजच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी सूरजचे कौतुकही केले आहे. दरम्यान, ‘झापुकू झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. हाचित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Suraj Chavan Meet Bharat Jadhav |
हेही वाचा:





