Video : धर्मेंद्र पाजींचा जबरदस्त डान्स.! ‘जाट’च्या स्पेशल स्क्रीनिंगला लावली हजेरी

Sunny Deol | JAAT | Dharmendra : अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित असा ‘जाट’ सिनेमा अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेरसिक या चित्रपटाची वाट पाहत होते आणि सनी पाजीच्या परतीसाठी खूप उत्सुक होते.
अखेर प्रतीक्षा संपली आणि आता प्रचंड कमाईची मालिका सुरू होण्याची वेळ आली आहे. गोपीचंद मालीनेनी सनी देओलला ‘जाट’ बनवले आहे, पण तो ‘जाट’ बनून प्रेक्षकांची मने जिंकू शकेल का? हेही लवकरच ठरवले जाईल.
दरम्यान, अश्यातच जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागील खरे कारण म्हणजे त्यात धर्मेंद्र नाचताना दिसत आहेत. धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या मुलांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनात दिसतात.
View this post on Instagram
‘जाट’च्या स्पेशल स्क्रीनिंगला धर्मेंद्र स्वतः उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा नाच पाहून प्रेक्षक आनंदित झाले. अलीकडेच त्यांच्या डोळ्यांवर उपचार झाले असून सुद्धा त्यांनी मुलाच्या यशासाठी आपल्या जोशात काहीही कमी पडू दिलं नाही.
धर्मेंद्रची ही शैली पाहून सर्वांना आनंद झाला. लाखो लोकांना ही-मॅन आवडतो, म्हणून त्याला असे डोलताना पाहून सर्वांनाच आनंद झाला. त्यांच्या या व्हिडिओला चाहते लाईक करत असून, त्यावर कमेंटचा सुद्धा वर्षाव करत आहे.
जर आपण ‘जाट’बद्दल बोललो तर या चित्रपटात सनी देओल रणदीप हुड्डासोबत टक्कर देणार आहे. या चित्रपटात रणदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘जाट’मध्ये सनी पाजी सहा खलनायकांशी भिडणार असून, ते अभिनेत्याच्या मार्गात काटा बनताना दिसतील. यासोबतच चित्रपटात उर्वशी रौतेलाचे एक आयटम सॉन्ग देखील आहे. जे सिनेमाला चार चांद लावणार आहे.
हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, आता आपल्याला पाहायचे आहे की गदर 2 नंतर ‘जाट’ काय चमत्कार करू शकते. आणि तिकीट बारीवर किती धुमाकूळ घालेल. चित्रपटात भरपूर अॅक्शन आहे, इमोशन आहेत आणि सनी देओलचा तोच रोखठोक अंदाज आहे.





