Vicky Kaushal : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल

Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार होता. पण ‘पुष्पा 2’ मुळे निर्मात्यांचे टेन्शन वाढल्याने या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. आता 2025 मध्ये म्हणजेच पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘पुष्पा 2’ च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर ‘छावा’च्या निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे. दिनेश विजनचा मॅडॉक फिल्म्सचा बहुप्रतिक्षित ‘छावा’ आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विकी कौशलची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असलेल्या ऐतिहासिक नाटकाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. खास दिवस निवडण्याचे कारण म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचा टीझरला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. विकी कौशल यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. तरण आदर्शने ट्विट करून हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
VICKY KAUSHAL – RASHMIKA – AKSHAYE KHANNA: ‘CHHAAVA’ NEW RELEASE DATE ANNOUNCEMENT… #Chhaava is now set for a theatrical release on 14 Feb 2025… The release date holds special significance since it coincides with Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on 19 Feb 2025.
Produced… pic.twitter.com/kDMrY7RDqN
— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2024
दरम्यान, यापूर्वी शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांचा ‘देवा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला रिलीजची नवी तारीख मिळाली आहे. शाहिद कपूरचा हा चित्रपट 14 फेब्रुवारीऐवजी 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशलने त्याच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. मात्र, लवकरच तो ‘छावा’च्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
हेही वाचा:





