BJP News : भाजपमध्ये ५० वर्ष काम केलेल्या दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
BJP News : चिरंजीलाल टांक यांनी तब्बल ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतर भाजपच्या प्राथमिक व सक्रिय सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

BJP News : भारतीय जनता पक्षाशी जनसंघाच्या काळापासून जोडलेले ज्येष्ठ नेते चिरंजीलाल टांक यांनी तब्बल ५० वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्षसंघटना आणि सत्तेतील नेत्यांकडून गेल्या १० ते १२ वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (BJP News)
चिरंजीलाल टांक यांनी आपला राजीनामा भाजपचे राजसमंद जिल्हाध्यक्ष जगदीशचंद्र पालीवाल यांच्याकडे पाठवला आहे. त्यांच्या राजीनामापत्राची प्रत जयपूर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयालाही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (BJP News)
सरपंच ते पंचायत समिती प्रधान; पक्षासाठी पाच दशकांचे योगदान
चिरंजीलाल टांक हे गेल्या पाच दशकांपासून भाजपशी संबंधित असल्याचे सांगतात. त्यांनी १९९५ ते २००० या काळात लसानी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००० ते २००३ या काळात भाजपचे संयुक्त देवगड मंडळाध्यक्ष आणि २००५ ते २०१० या काळात देवगड पंचायत समितीचे प्रधान म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या राजकीय प्रवासात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याचे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. (BJP News)
सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे नाराजी?
टांक यांनी स्थानिक नेतृत्व आणि पक्षातील काही नव्या कार्यकर्त्यांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. पाच ते सात दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आपल्यासाठी ‘गद्दार’ आणि ‘दारुडा’ यांसारखे शब्द वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. (BJP News)
तसेच, आपल्याला पक्षातून बाहेर काढण्याबाबत किंवा आपण राजीनामा द्यावा, अशा स्वरूपाची वक्तव्ये झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी जड अंतःकरणाने पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. (BJP News)
ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासाची राजीनामापत्रात आठवण
आपल्या राजीनामापत्रात टांक यांनी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, दिवंगत हरिओम सिंह राठोड, दिवंगत किरण माहेश्वरी तसेच नंदलाल सिंघवी, बंसीलाल खटीक आणि मांधाता सिंह यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासाचा आणि मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. (BJP News)
पाच दशकांपासून पक्षाशी निष्ठा राखल्यानंतर राजीनामा देण्याची वेळ का आली, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (BJP News)





