Rahul Gandhi : राजीनामा होईपर्यंत थांबणार नाही; एसआयआरविरोधात राहुल गांधींनी स्पष्ट केली भूमिका
जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवत नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्ष एसआयआर प्रक्रियेविरोधातील आपले आंदोलन थांबवणार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Rahul Gandhi : जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवत नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्ष एसआयआर प्रक्रियेविरोधातील आपले आंदोलन थांबवणार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राजधानीतील त्रिलोकपुरी येथे जन सुनावणी कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत, केवळ या भागातील चार मतदान केंद्रांमधून ४१६ मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेवरील तक्रारींच्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान त्यांच्यासोबत सीपीआय (एमएल) नेते दिपांकर भट्टाचार्य आणि स्वराज्य इंडियाचे योगेंद्र यादव उपस्थित होते.
आम्ही येथे पाहिले की, चार मतदान केंद्रांमधून ४१६ मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आली आहेत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु ते उत्तर देण्यास नकार देतात आणि टाळाटाळ करतात. पण आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्ष आपला लढा सुरूच ठेवेल.
देशभरातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. कॉंग्रेस पक्ष हा मुद्दा बऱ्याच काळापासून मांडत आहे, परंतु आता संपूर्ण देशाला हे समजू लागले आहे की सर्वोच्च स्तरावर मतांची चोरी होत आहे. गरीब लोकांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत आणि त्यांचे हक्क हिसकावून घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी (Rahul Gandhi) केला.
हे देशद्रोहासारखेच आहे
राहूल गांधींनी (Rahul Gandhi) आरोप केला की, अब्जाधीशांच्या निवडक गटाचा एक नवीन भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जिथे नागरिकांना कोणतेही हक्क नसतील आणि गरिबांना त्यांचे हक्क नाकारले जातील, ज्यामुळे देश केवळ अब्जाधीशांच्या हितासाठी काम करेल.
नरेंद्र मोदी केवळ श्रीमंतांसाठी हिंदुस्तान निर्माण करण्यावर ठाम आहेत. ज्ञानेश कुमार मतदार यादीतून लोकांची नावे फसवून काढून मतचोरी करत आहेत, जे देशद्रोहासारखेच आहे. आम्ही या अन्यायाविरुद्ध एकत्र आवाज उठवू आणि लोकांच्या मतदानाच्या हक्काचे रक्षण करू असे गांधी म्हणाले.






