दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये दिसणार क्रिती सॅनन

मुंबई – क्रिती सॅनन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने टायगर श्रॉफ सोबत 2014 मध्ये हिरोपंती या चित्रपटातून पदार्पण केले आणि तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. तिने मिमी, बरेली की बर्फी, लुका छुप्पी आणि इतर सारख्या चित्रपटांमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.
यातच क्रिती सेनॉनला दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीची बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली आहे. अशी चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चांवर क्रिती म्हणाली की, अद्याप चित्रपट साइन केलेला नाही. परंतु मी या ऑफरबद्दल नक्कीच फार आनंदी आहे.
दरम्यान, टी-सीरीज मीना कुमारीवर बायोपिक बनवण्याची योजना आखत आहे. क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास नुकताच बच्चन पांडे या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही प्रमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.





