अत्यंत दुर्दैवी घटना ! केरळात पर्यटकांची बोट उलटली ; २१ जणांनी गमावला जीव, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : केरळात मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर आली आहे. केरळातील मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर गावात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत २१ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी बोटीत ४० च्या आसपास पर्यटक होते. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या २१ वर गेली आहे, अशी माहिती केरळाचे राज्यमंत्री वी. आब्दुराहमान यांनी दिली आहे.
Malappuram, Kerala | Six people died after a tourist boat capsized near Tanur in Malappuram district of Kerala. Rescue operations are underway. pic.twitter.com/gPi0u2HuIi
— ANI (@ANI) May 7, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. याची माहिती मिळतात अग्निशमन आणि स्वयंसेवी दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण, अंधार असल्याने बचावकार्याला अडथळे निर्माण होत आहेत. बोटीखाली अनेक लोक अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Pained by the loss of lives due to the boat mishap in Malappuram, Kerala. Condolences to the bereaved families. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be provided to the next of kin of each deceased: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2023
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत केली आहे.





