Venkatesh Slams Musk : “अमेरिकेत टेस्ला वाचवण्यासाठी नियम लावले अन् आता…”; व्यंकटेश प्रसादने एलॉन मस्कला भर इंटरनेटवर झापले! नेमकं कारण काय?
Venkatesh Slams Musk : एलॉन मस्कने मुकेश अंबानी यांचा उल्लेख भारताचे पंतप्रधान म्हणून केला होता आणि म्हटले होते की त्यांच्यामुळे स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची परवानगी मिळत नाही. व्यंकटेश प्रसाद यांनी मस्कला आरसा दाखवला आहे.

Venkatesh Prasad Slams Elon Musk Over Ambani Post Starlink India Entry : सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या ‘स्टारलिंक’ला (Starlink) भारतात अद्याप परवानगी न मिळाल्याने जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडियावर आपली भडास काढली आहे. मस्क यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना थेट लक्ष्य करत ‘भारताचे खरे बॉस’ अशी खोचक टीका केली होती. मस्क यांच्या या विधानानंतर भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी एक्सवर पोस्ट करत मस्क यांना आरसा दाखवला असून, त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे.
“प्रिय पंतप्रधान अंबानी…”; मस्क यांनी काढली होती उघड भडास!
एलॉन मस्क यांनी एक्सवर अत्यंत उपरोधिक पोस्ट करत लिहिले होते, “प्रिय पंतप्रधान अंबानी, आपणच भारताचे खरे बॉस आहात हे न समजल्याबद्दल मला माफ करा. साहजिकच आपण भारतीय जनतेचे मक्तेदारीतून शोषण करणे पसंत कराल; पण तरीही आपण स्टारलिंकला स्पर्धेची संधी देण्यावर विचार कराल का? इंटरनेट नसल्याने भारतातील दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत, स्टारलिंक त्यांचे जीवन बदलू शकते.”
व्यंकटेश प्रसादचे सडेतोड उत्तर; मस्क यांच्या दुटप्पीपणावर बोट!
Extremely poor from President Musk, who ensured BYD didn’t enter the US for fear of his Tesla sales crumbling . And here making an issue out of our right for national security. A great entrepreneur but a v bitter man. Earlier went after Trump claiming his name is in Epstein files only to calm down later to ensure his business doesn’t suffer. Lol Musk.
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) October 10, 2026
मस्क यांच्या या पोस्टवर संताप व्यक्त करत व्यंकटेश प्रसाद यांनी लिहिले की, “टेस्लाची विक्री कमी होईल या भीतीने ज्या व्यक्तीने चिनी कंपनी BYD च्या गाड्या अमेरिकेत येऊ दिल्या नाहीत, तोच माणूस आता भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर रडगाणे गात आहे. मस्क हे एक मोठे उद्योजक नक्कीच असतील, पण ते अत्यंत वाईट माणूस आहेत. बिझनेस वाचवण्यासाठी यांनी आधी ट्रम्प यांच्यावर आरोप केले आणि नंतर स्वतःच गप्प बसले.”
भारतात परवानगी अडकल्याने मस्क यांची निराशा!
https://t.co/DJYynAyO0W
— Elon Musk (@elonmusk) October 10, 2026
स्टारलिंक कंपनी बऱ्याच काळापासून भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सुरक्षेचे कडक नियम आणि स्पेक्ट्रम वाटपाच्या अटींमुळे त्यांना अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. याच नैराश्यातून मस्क आता भारतीय उद्योगपतींवर खाजगी हल्ले करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.





