Vehicle Sale – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वाहन खरेदीची परंपरा यंदाही कायम राहिली. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहराच्या रस्त्यावर ५१२४ नवी वाहने उतरली. पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या वाहन खरेदीमुळे शासनाच्या तिजोरीत कर आणि शुल्काच्या स्वरुपात एकूण ४२ कोटी ३८ लाख ४० हजार ४२७ रुपयांची भर पडली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरात वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण ५,१२४ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. वाढत्या शहरीकरणासह पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने वाहनांची संख्याही सातत्याने वाढताना दिसत आहे. शहराचा विस्तार, नवीन गृहप्रकल्प, आयटी व औद्योगिक क्षेत्रातील वाढ यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि प्रवास वाढला आहे. त्यामुळे वैयक्तिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसते. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने या दिवशी वाहन खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक नागरिक या शुभ मुहूर्तावर नवीन दुचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांची खरेदी करतात. सर्वाधिक विक्री दुचाकींची यंदाही दुचाकींची विक्री सर्वाधिक झाल्याच दिसून आले. २७६३ दुचाकी, १८३९ मोटारीची नोंदणी झाली. मालवाहू वाहनांची २०८, मोटार कॅब १५५, तीन चाकी प्रवासी ७० आणि मालवाहू १४ वाहनांची नोंदणी झाली आहे. तसेच प्रवासी बस, स्कूल बस, अॅम्ब्युलन्स, ट्रॅक्टर, क्रेन व बांधकाम यंत्रणा यांसारख्या विविध प्रकारच्या वाहनांचाही नागरिकांनी खरेदी केली आहे. इलेक्ट्रिकला पसंती कमीच इंधन प्रकारानुसार पाहता पेट्रोल आणि पेट्रोल/E20 वाहनांना सर्वाधिक पसंती मिळाली असून, इलेक्ट्रिक वाहनांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून आले. मध्यंतरी इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये स्फोट होण्याच्या घटना, सुटे पार्ट्स सहज उपलब्ध न होणे, तसेच सेवा-सुविधा आणि सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल कमीच असल्याचे चित्र आहे. एकूण दुचाकींमध्ये केवळ २९४ इलेक्िट्रक दुचाकीची नोंद झाली आहे. तर मोटारींमध्ये २९४ मोटारी इलेक्िट्र.क आहेत. “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विविध कर व शुल्कांद्वारे एकूण ४२ कोटी ३८ लाख ४० हजार ४२७ रुपये जमा झाले आहेत. यंदाही दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे सध्या कल कमी दिसत असला तरी भविष्यात पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढेल. – राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी