वादळग्रस्त भागांना वाहन कंपन्यांची मदत
Updated On:

नवी दिल्ली – फणी या वादळामुळे ओडिशा आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या काळात ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले ती वाहने ताबडतोब दुरुस्त करून देण्यासाठी मोटार कंपन्या पुढाकार घेत आहेत.
याबाबत ह्युंदाई मोटरने सांगितले की, कंपनीने एक कृती दल स्थापन केले असून वादळग्रस्त भागातील ग्राहकांना मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या खराब झाल्या आहेत, त्या वेगाने दुरुस्त करून देण्याबरोबरच त्यांना सवलतीच्या दरात वाहनांचे सुटे भाग उपलब्ध केले जाणार आहेत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.




