#VeerBalDiwas : पंजाब, महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी – मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पंजाब व महाराष्ट्राची भूमी संतांना व विरांना जन्म देणारी आहे. चाफेकर बंधू, राजगुरु सारखे क्रांतीकारी महाराष्ट्रात जन्माले आले. तर भगतसिंगसारखे क्रांतीकारी पंजाबमध्ये जन्माले आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच “वीर बाल दिवस’च्या इतिहासामुळे देशातील तरूण पिढीला शौर्य, देशप्रेम आणि त्यागाची प्रेरणा मिळेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ऐतिहासिक “वीर बाल दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
भारतातील वीरांनी देश,धर्म व स्वाभिमानाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. हीच वीरता-देशभक्तीची परंपरा व संत संस्कृती यामधील समानतेमुळे महाराष्ट्र आणि पंजाबमधील दृढसंबंधाची प्रचिती येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री @mieknathshinde
यांनी येथील #वीरबालदिवस सोहळ्यात केले. pic.twitter.com/qQBrO2NHY0— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) December 26, 2022
एकनाथ शिंदे म्हणाले, वीर बाल दिवस सारख्या सर्वोच्च त्याग सोहळ्याच्या आयोजनामुळे इतिहासाची प्रेरणा नक्कीच निर्माण होईल. यामुळे ही पिढी राष्ट्र विकासात आपले योगदान निश्चितच देईल. हे वर्ष स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांचा शहीदी दिवस “वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. ही सर्वांसाठी संस्मरणीय ऐतिहासिक अशी घटना आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र आणि पंजाबचा संबंध समसमान आहे. चापेकर बंधू आणि भगतसिंग यांच्या सोबत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच होते. दोन्ही राज्यात क्रांतीकारांची एक गौरवशाली परंपरा आहे.
Recruitment : आरोग्य विभागाची पदभरतीची जाहिरात जानेवारीत काढणार – आरोग्यमंत्री सावंत
महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आत्मीयतेचे नातेही आहे. दोन्ही राज्यातल्या मातीने अनेक वीरांना, महान संतांना जन्म दिलेला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये शतकांपासून एकोपा आहे. घुमानमध्ये संत नामदेव यांचे निवासस्थान आहे, तर नांदेडमध्ये गुरुगोबिंद सिंग जी यांचे समाधीस्थळ असल्याचे त्यांनी सांगितले.





