Vasant More post : नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, सर्वेाच्च न्यायायलाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक सतत लांबणीवर पडत असल्याने पुण्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला खोचक सल्ला दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या दाव्यावर वसंत मोरे यांनी 165 नगरसेवक असणाऱ्या पुणे महापालिकेत भाजपला निवडणुकीची भीती वाटत, असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे 100 तुम्ही जाहीर करा आणि किमान उरलेल्या 65 जागांवर तरी निवडणूक घ्या असा खोचक सल्ला भाजपला दिला आहे. वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट ‘व्हय मी काय म्हणतो… आज सकाळी चहा पिताना एक विचार मनात आलाय भाजपा म्हणते पुण्यात आमचे 100 नगरसेवक निवडून येणार मग माझं पुणे भाजपाला एक सांगणं आहे, तुम्हाला जर निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे 100 नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका आणि कृपा करून उरलेल्या 65 जागांवर तरी निवडणुका घ्या राव… लय कटाळा आलाय आणि ते इच्छुक तर पार पार बेजार झालेत खर्च करून करून’ असं वसंत मोरे पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेचा गेल्या काही दिवसांपूर्वी नवा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. या नव्या प्रभाग रचनेवर भाजपचा होल्ड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नव्या प्रारुप प्रभाग रचनेत पुण्यात एकूण ४१ प्रभाग तर नगसेवकांची संख्या १६५ करण्यात आली आहे. ४१ पैकी ३८ नंबरच्या प्रभागात पाच नगरसेवकांचा करण्यात आला आहे, तर बाकी प्रभाग चार नगरसेवकांचे करण्यात आला आहे. या नव्या प्रभाग रचनेवर हरकती देखील घेण्यात आलेल्या आहेत. हेही वाचा : गोव्यात व्हेकेशन टूर! कुटुंबासह अमोल पराशरसोबत दिसली कोंकणा सेन शर्मा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल