Ganpati Visarjan 2025 | लाडक्या गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर आज त्याला निरोप दिला जात आहे. मुंबई, पुण्यासह गणपती बाप्पाच्या विसर्जन ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. गणपती बाप्पााच्या निरोप मिरवणुकीला मुंबईत पावसानेही हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, आजही हवामान विभागाने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर आकाशातही काळे ढग दाटून आले आहे. मुंबईसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज शनिवारी मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज IMDच्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाची संततधार कायम असेल. तर, मुंबई उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काळ्या ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर उपनगरांत मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे. दरम्यान, पावसामुळे गणपती मिरावणुकीच्या प्रवासाचा वेगही मंदावण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईत गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी सर्वात आधी मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अंधेरीचा राजा आणि परळ-लालबाग परिसरातील मानाचे गणपती मंडपातून निघणार आहेत. हेही वाचा: पुण्याच्या रस्त्यांवर बाप्पाच्या गाण्यांची धून ; अप्रतिम वादनाने परिसर मंत्रमुग्ध