Nagar | शासनाचा विविध योजणा जनतेपर्यंत पोहचविल्या : प्रदेशाध्यक्ष कदम

नगर, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्या अर्थसंकल्पात महिला, विद्यार्थी, युवक, शेतकरी, कर्मचारी या सर्व घटकांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आहेत. त्या योजना आमदार संग्राम जगताप प्रभावी पणे राबवत असून त्या जनेतेपर्यंत पोहचविल्या जात आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी व्यक्त केले.
ज्या योजना आणल्या त्या सविस्तरपणे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मांडल्या. आणी त्या योजना शहराचे आमदार संग्रामव् जगताप यांनी प्रभावी पणे राबवत जनते पर्यंत पोहचवल्या त्यामुळे नागरिकांना याचा लाभ मिळाला.
विद्यार्थी युवती संवाद मेळावा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या नेतृत्वात व आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडला.
या मेळाव्याच्या निमित्त लाडकी बहीण योजना , विद्यार्थनींना मोफत शिक्षण ,शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक अनेक योजनाच्या प्रभावी अंबालाबाजवणी निमित्त युवक युवतींकडून स्वाक्षरी अभियान राबवून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत संपन्न झाले. या कार्यक्रमास विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.
या विद्यार्थी संवादाचे आयोजन विद्यार्थी शहर अध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले. प्रसंगी जेष्ठ नेते प्रा.माणीकराव विधाते, युवती प्रदेश कार्याध्यक्ष अंजली आव्हाड , विधानसभा अध्यक्ष सागर गुंजाळ, अल्पसंख्यांक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी अध्यक्ष अमित खामकर,
अब्दुल खोकर,राहुल नेटके, राधेय दांगट,ऋषिकेश बागल,प्रांजल खाकाळ,प्रसाद शिंदे, शुभम नांगल,अश्विनीताई शिंदे, रोहिणी अंकुश कार्तिकी बोधले , ओंकार आव्हाड, स्वप्नील भोरे, तुषार भोस, ओंकार शेडाळे, आदी उपस्थिती होते





