Varandha Ghat Closed : वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीस बंद !

Varandha Ghat Closed : कोकण आणि पुण्याला जोडणारा म्हणून वरंधा घाटाची ओळख आहे. महाडवरून भोर मार्गे या घाटातून पुण्याला लवकर जाता येते. या घाटातून अनेक जण प्रवाश करतात. मात्र हा घाट आता 31 ऑगस्टपर्यंत सर्व वाहतुकीस बंद राहणार आहे, अशी अधिसुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. हा घाट बंद असल्याने पुण्याला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रायगडमध्ये 19 जूनला जोरदार पाऊस झाला होता. या पावसात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली होती. शिवाय यामुळे रस्ताही खचला होता. त्यामुळे या ठिकाणी रस्ता हा वाहतुकीसाठी अरुंद आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळेच हा घाट आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील रायगड जिल्हा हद्दीत वरंधा घाट 21 कि.मी.लांबीचा आहे.
या घाटात अवघड वळणे आहेत. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. यामुळे आता खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, पुण्याला जाण्यासाठी ताम्हाणी घाटामार्ग प्रवाशांना जाता येणे शक्य आहे.





