भीषण अपघात ! पुण्याजवळील वरंधा घाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली ; १ ठार तर ८ जण जखमी

Varandh Ghat Accident। पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घाटात शंभर फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात शुभम शिर्के (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यामध्ये अन्य 8 जण जखमी झाले आहेत.
एकाच जागीच मृत्यू Varandh Ghat Accident।
आज पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. महाड होऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमचा सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघातात शुभम शिर्के (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश गुजर (26), आशिष गायकवाड (29), सिद्धार्थ गंधणे (26), सौरभ महादे (22), गणेश लवंडे (27), अमोल रेकीणर (27), यशराज चंद्र (22) आणि आकाश आडकर (25) हे गंभीर जखमी झाले आहेत.
कसा झाला अपघात ? Varandh Ghat Accident।
पुण्यातील भोर महाड मार्गावर सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भोर महाड मार्गावरील वरंध घाटात इको कार महाडहून भोरच्या दिशेने जात होती. घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून इतर 8 जण गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. जखमींना तात्काळ बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याचा भोर पोलीस अधिक तपास करत आहेत.





