Vande Mataram Protocol : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! ‘जन गण मन’ आधी वाजले ‘वंदे मातरम्’; नेमकं कारण काय? पाहा VIDEO
Vande Mataram Protocol : सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' वाजण्यापूर्वी राष्ट्रगीत 'वंदे मातरम्' वाजवण्यात आले, नेमकं असं का करण्यात आले? जाणून घेऊया

Vande Mataram Played Before National Anthem In IND vs AFG T20 Match Delhi New Protocol : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर क्रिकेटच्या इतिहासातील एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात एकत्र आले, तेव्हा भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ वाजण्यापूर्वी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ वाजवण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या इतिहासात राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या नव्या बदलामुळे सामना सुरू होण्यास नियोजित वेळेपेक्षा सुमारे सव्वाचार मिनिटे उशीर झाला.
संसदेत नवा कायदा मंजूर; राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ला समकक्ष सन्मान!
राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवण्यामागे नवा सरकारी प्रोटोकॉल कारणीभूत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०२६ मध्ये ‘राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायदा’ (Prevention of Insults to National Honour Act) संमत करण्यात आला. या कायद्यानुसार आता ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणणे किंवा त्याचा अवमान करणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला असून त्याला राष्ट्रगीताचा समकक्ष दर्जा मिळाला आहे. नव्या प्रोटोकॉलनुसार आता राष्ट्रगीतादरम्यान सर्वांना सावधान स्थितीत उभे राहावे लागेल तसेच पूर्वीच्या २ कडव्यांऐवजी संपूर्ण ६ कडवी ३ मिनिटे १० सेकंदांत सादर केली जातील.
नाणेफेक जिंकून गोलंदाजी; श्रेयस अय्यरने स्पष्ट केली रणनीती!
STORY: In a first, national song Vande Mataram played after national anthem at India’s international game
In a first ever instance at an international sporting event, national song Vande Mataram, penned by Bankim Chandra Chattopadhyay, was played after national anthem ‘Jana Gana… pic.twitter.com/5ilm5ghP4x
— Press Trust of India (@PTI_News) September 13, 2026
पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील मैदानाची परिस्थिती आणि खेळपट्टीचा अंदाज असल्याने हा निर्णय घेतल्याचे अय्यरने सांगितले. संघात जसप्रीत बुमराह, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी दुखापतीतून सावरत पुनरागमन केले आहे.
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला डच्चू; संजू सॅमसनला सलामीची संधी!
🚨First time in an India international cricket match.
Today in Delhi, Vande Mataram was played in full before Jana Gana Mana at the India–Afghanistan T20.
This follows the government’s new protocol. The two were first sung together after PM Modi’s Independence Day speech this…
— InsightRadar (@InsightRadarX) September 13, 2026
प्लेइंग इलेव्हनच्या निवडीत संघ व्यवस्थापनाने १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला बाहेर बसवले आहे. त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत डावाची सलामी देण्याची संधी देण्यात आली. नाणेफेकीनंतर मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करत अफगाणिस्तानला अडचणीत आणले होते. मात्र, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कमबॅक करत शेवटच्या टप्प्यात धावांचा पाऊस पडला. यजमान संघाने ८ गडी गमावून १५६ धावा करत भारतासमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.





