शेतकरी कुटुंबाने उभारले वामनभाऊ, भगवान बाबांचे मंदिर
Updated On:

अहमदनगर – राष्ट्रसंत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांसह श्री विठ्ठल यांच्या मूर्तींची ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते पिंगेवाडी (ता. शेवगाव) येथील मंदिरात धार्मिक विधीनुसार प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. तर कौशल्य दासजी महाराज खाकी बाबा संस्थान हिंगोली यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले.
शेतकरी शिवाजी मुंढे, बंडू मुंढे या भावंडांनी स्वखर्चातून हे मंदिर उभारले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त 22 ते 24 मे दरम्यान विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन दिवसीय कीर्तन सोहळ्यात कल्याण महाराज जायभाये, गहिनीनाथ महाराज खेडकर, रामगिरी महाराज यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





