वाघोली (पुणे) – येथील तुकाराम बाजीराव सातव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बापूसाहेब सातव पाटील, संजय सातव पाटील, माणिक सातव पाटील, अविनाश सातव पाटील, सागर सातव पाटील, अक्षय सातव पाटील, समीर सातव पाटील, अभिजीत सातव पाटील कुटुंबीयांनी आयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी व वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या विकास कामासाठी वाघोली विकास प्रतिष्ठान यांच्याकडे प्रत्येकी 51 हजार अशी एकूण 1 लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यामुळे वाघोली परिसरात सातव पाटील कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.
सातव कुटुंबीयांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबीयांकडून सामाजिक जाणीव ठेवत केली गेलेली मदतही जाणिवेचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. यापुढील काळात देखील सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवणार आहोत, असे अविनाश सातव पाटील यांनी सांगितले.