वैष्णवीची आत्महत्या की हत्या? फॅन 71 किलो वजन पिलवू शकतो का? फॉरेन्सिक तपासाकडे सर्वांचे लक्ष

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवण्यास सुरूवात केली आहे. वैष्णवीचा पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणातील महत्वाची कडी असलेल्या निलेश चव्हाण याला देखील पोलिसांनी नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले. आता या सगळ्यात या प्रकरणात एक महत्वाची घडामोड घडणार आहे. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली. या संदर्भात ठोस पुरावा हाती लागू शकतो.
वैष्णवीने १६ मे रोजी तिच्या सासरच्या घरी आत्महत्या केली होती. खोलीतील पंख्याला लटकून साडीच्या साह्याने तिने गळफास घेतला होता. यामुळे वैष्णवीची साडी आणि पंखा या दोन्ही गोष्टी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आोरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाईल देखील तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक पुरावे सापडण्याची शक्यता आहे.
पंखा ७१ किलो वजन पेलवू शकतो का?
वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केल्यानंतर १७ मे रोजी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी तिचे वजय ७१ किलो असल्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे तिने ज्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला, तो पंखा ७१ किलो वजन पेलवू शकतो का? याची तपासाणी करण्यासाठी या वस्तू फॅारेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी पुणे सत्र न्यायालयाने वैष्णवीचा पती शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
हेही वाचा: “दादांच्या नावाचा पुरस्कार, मला लयं भारी वाटतयं”; सूरज चव्हाणचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मान





