Vaishnavi Hagawane : वैष्णवी प्रकरणात नवं वळण! आईच्या शब्दांत लपलेलं सत्य समोर; ‘त्या’ पत्राबद्दल अंजली दमानिया यांचा मोठा खुलासा

Anjali Damania । Vaishnavi Hagawane : पुण्यात हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा इतका जाच केला की तिला जगण्यापेक्षा मृत्यू अधिक सोपा वाटला. तिच्या मृत्यूनंतरची जी कहाणी समोर आली आहे, ती अत्यंत संतापजनक असून त्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
काल (दि. २३) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे.
विशेषतः वैष्णवीची नणंद ‘करिश्मा हगवणे’ ही या प्रकरणातील एक महत्त्वाची आणि वादग्रस्त व्यक्ती बनली आहे. तिचे राजकीय नेत्यांसोबत देखील संबंध असल्याचं आता उघड झालं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजनिया दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नवनवे खुलासे समोर येत आहेत. अंजली दमानिया या देखील याप्रकरणाचा कसून पाठपुराव करत आहेत.
हगवणे कुटुंबियांचे अत्याचर आणि दोन्ही सुनांवर काय परिस्थिती ओढवली होती, याबाबत बोलत दमानिया यांनी प्रतिक्रियाही दिली. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘मयुरी जगतापने अनेक खुलासे केले होते, वैष्णवीप्रमाणेच माझाही छळ व्हायचा असा आरोप मयुरीने केला होता.
आता या प्रकरणात दमानिया यांनीच लक्ष घातलं असून त्या मोठा खुलासाही करणारा आहेत. मयुरीच्या आईने जे पत्र लिहीलं त्याबद्दलही त्या बोलल्या. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.
मयुरी ही विनाकारण आरोप करणार नाही, मयुरीच्या आईने, जे पत्र महिला आयोगाला लिहिले होते त्यात असेही लिहिले आहे, की राजेंद्र हगवणे यांनी सुद्धा मयुरीला एकदा थप्पड मारली होती. तिचे कपडे फाडले होते.
आणि मयुरीच्या दिराने, शशांकनेही असं काही केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. हगवणे हे केवळ लोभी नाही तर विकृत कुटुंब आहे अशी टीका दमानिया यांनी केली. तसेच या कुटुंबाला राजकीय साथही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अंजनिया दमानिया यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत !
अंजनिया दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून व्हिडिओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेल्याचे दिसत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबत वैष्णवीची नणंद ‘करिश्मा हगवणे’ असल्याचे दिसत आहे.
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार?
ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत?
हे पण वरवरचे संबध आहेत का?
आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे?
धक्कादायक pic.twitter.com/a719tBvog5
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025
त्यांनंतर एका फोटोत करिश्मा हगवणे व सुप्रिया सुळे दिसत आहेत. आणखी एका फोटोत शरद पवारांना भेटण्यासाठी आलेली करिश्मा हगवणे दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असून, नेटकरी अनेक सवाल उपस्थित करत आहेत.





