Vaishnavi Hagawane : करिश्मा उर्फ ‘पिंकी ताई’! कंपनीची मालकीण, पण वागणं गुंडांपेक्षा वाईट; वैष्णवीचा छळ करणारी ‘ही’ अविवाहित महिला कोण?

Vaishnavi Hagawane | Karishma : वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे.
या दोघांचे अटकेआधीचे हॅाटेलमध्ये बसून जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे मटणावर ताव मारताना दिसत आहेत. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर आता पूर्ण हगवणे कुटुंब अटकेत आहे.
विशेषतः वैष्णवीची नणंद ‘करिश्मा हगवणे’ ही या प्रकरणातील एक महत्त्वाची आणि वादग्रस्त व्यक्ती बनली आहे. वैष्णवीची थोरली सून मयुरी जगताप आणि वैष्णवीच्या वडिलांनी करिश्मावर थेट मानसिक व शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, ‘करिश्मा हगवणे आहे तरी कोण आहे?’
‘करिश्मा हगवणे’ ही वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. ती हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य आहे. ती 34 वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. पण घरातले सगळे निर्णय तिच घेते, असं म्हणतात. ती ‘पिंकीताई’ म्हणून ओळखली जाते. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला, असा आरोप आहे. संपूर्ण घराचा कंट्रोल हा करिश्माच्या हातात आहे.
करिश्मा हगवणेही फॅशन डिझायनर असून ‘लक्ष्मीतारा’ या नावाने तिने स्वतःची डिझायनिंग कंपनी सुरू केली आहे. ती सध्या पालकांसोबत मुळशी तालुक्यात राहते. तिच्या दबदब्याचा प्रभाव इतका होता की, घरात कोण कोणाशी बोलेल, कोण कशी वागेल, हेही तीच ठरवत असे. मयुरी आणि वैष्णवी एकाच घरात राहूनही त्यांना एकमेकींशी बोलण्यासही मज्जाव होता. तसेच गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला अडवायच्या.
पवार कुटुंबात सोबत करिश्मा हगवणेचं कनेक्शन :
सामाजिक कार्यकर्त्या अंजनिया दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेल्याचे दिसत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबत वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे असल्याचे दिसत आहे.
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार?
ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत?
हे पण वरवरचे संबध आहेत का?
आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे?
धक्कादायक pic.twitter.com/a719tBvog5
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025
त्यांनंतर एका फोटोत करिश्मा हगवणे व सुप्रिया सुळे दिसत आहेत. आणखी एका फोटोत शरद पवारांना भेटण्यासाठी आलेली करिश्मा हगवणे दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.





