Vaibhav Suryavanshi Fifty : हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीचा ‘रुद्र अवतार’! ३३ चेंडूंत २०० च्या स्ट्राईक रेटने कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
Vaibhav Suryavanshi fifty : भव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने २०६.०६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना अवघ्या ३३ चेंडूंत ६८ धावांची तुफानी खेळी केली.

Vaibhav Suryavanshi fifty against Afghanistan : अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर ३११ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. वैभवने आपल्या आक्रमक फलंदाजीने अफगाण गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. मात्र, एक मोठी आक्रमक खेळी करण्याच्या नादात तो बाद झाला.
वैभवचा २०६ चा स्ट्राईक रेट; अफगाण गोलंदाज गारद –
३११ धावांचे लक्ष्य समोर असताना भारताला स्फोटक सुरुवातीची गरज होती. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने २०६.०६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना अवघ्या ३३ चेंडूंत ६८ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. त्यामुळे वैभव क्रीझवर असेपर्यंत ३११ धावांचे लक्ष्य अगदी सोपे वाटत होते. दुर्दैवाने, अर्धशतकानंतर मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली.
सलामीची दमदार ९० धावांची भागीदारी –
वैभव सूर्यवंशी ने अफगानिस्तान को धूल चटाकर क्या शानदार पारी खेला है।💥🔥
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने अफगानिस्तान के खिलाफ 24 गेंदों में 50 रन बनाया है।
आउट होने से पहले वैभव ने सिर्फ 33 गेंदों में 9 चौकों और 4 छक्कों की मदद से 68 रन बनाया है।#vaibhavsuryavanshi #INDvsAFG pic.twitter.com/zlCBspoH9H
— Kuldeep Yadav (@Kuldeepkumar497) February 4, 2026
वैभव सूर्यवंशी आणि म जॉर्ज यांनी पहिल्या विकेटसाठी १० षटकांत ९० धावांची वेगवान भागीदारी केली. विशेष म्हणजे, या ९० धावांपैकी ६८ धावा एकट्या वैभवच्या होत्या. आरोन जॉर्जने दुसऱ्या टोकाकडून वैभवला चांगली साथ दिली आणि धावफलक हलत ठेवला. वैभवच्या या वादळीने भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पक्कड निर्माण केली आहे.
टीम इंडियासमोर ऐतिहासिक आव्हान –
वैभव सूर्यवंशी स्फोटक ६८ धावा
अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात भारतासमोर पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य आहे. अफगाणिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३१० धावा करून भारताला मोठे आव्हान दिले आहे. वैभव बाद झाला असला तरी भारताने १०० धावांचा टप्पा पार केला आहे. आता कर्णधार आयुष म्हात्रे आणि मधल्या फळीतील फलंदाज भारताला फायनलपर्यंत नेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





