IND vs AFG : अफगाणिस्तानचा भारताला ‘दे धक्का’! ३८ वर्षांच्या इतिहासात जे घडलं नाही ते करून दाखवलं
IND vs AFG : अंडर-१९ क्रिकेटच्या ३८ वर्षांच्या इतिहासात भारताविरुद्ध एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IND vs AFG Afghanistan U19 creates history : अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. फैसल शिनोझादा आणि उजैरुल्लाह नियाझी या जोडीने भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवत शतके झळकावली. अंडर-१९ क्रिकेटच्या ३८ वर्षांच्या इतिहासात भारताविरुद्ध एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अफगाणिस्तानची विक्रमी ‘सेंचुरी’ भागीदारी –
हरारे येथे सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार महबूब खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत फलंदाजांनी ५० षटकांत ४ बाद ३१० धावांचा अवाढव्य स्कोअर उभा केला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फैसल शिनोझादाने ९३ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. त्यानंतर उजैरुल्लाह नियाझीने ८६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०१ धावा कुटल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० चेंडूत १४८ धावांची भागीदारी करत भारताला बॅकफूटवर ढकलले.
बेन स्टोक्सचा मोडला विक्रम –
आतापर्यंत अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध केवळ तीनच खेळाडू शतके झळकावू शकले होते, ज्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा (२०१०) समावेश होता. मात्र, शिनोझादा आणि नियाझी या जोडीने आज हा आकडा पाचवर नेला आहे. फैसल शिनोझादाने केलेल्या ११० धावा या भारताविरुद्धच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
Centuries from Faisal Shinozada and Uzairullah Niazai helps Afghanistan U-19 post a massive total of 3️⃣1️⃣0️⃣ on board
Can the India U-19 chase it down? 🤔
📸: Afghanistan Cricket/ X#INDvsAFG #U19 #SFs #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/UdoEWMcz5K
— InsideSport (@InsideSportIND) February 4, 2026
भारत विरुद्ध सर्वाधिक धावा (U19 वर्ल्ड कप):
१. मॅल्कम लेक (झिम्बाब्वे): ११८ धावा (२०१२)
२. टॅगेनारिन चंद्रपॉल (वेस्ट इंडिज): ११२ धावा (२०१४)
३. फैसल शिनोझादा (अफगाणिस्तान): ११० धावा (२०२६)
४. उजैरुल्लाह नियाझी (अफगाणिस्तान): १०१ धावा (२०२६)
५. बेन स्टोक्स (इंग्लंड): १०० धावा (२०१०)
हेही वाचा – Ind Vs Pak : भारत –पाकिस्तान सामन्यावर गौतम गंभीरच्या ‘त्या’ वक्तव्याची होतेय चर्चा
टीम इंडियासमोर कठीण आव्हान –
भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता ३११ धावांचे महाकाय लक्ष्य गाठायचे आहे. भारतीय गोलंदाजी आज पूर्णपणे निप्रभ ठरली असून आता सर्व मदार फलंदाजांवर आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.





