Vaibhav Suryavanshi Crying : वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर! बुमराहला धुतल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला; काय होतं कारण? पाहा VIDEO
Vaibhav Suryavanshi Crying : १५ वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने तर जिंकलीच, पण त्यानंतर तो भावुक झाला.

Vaibhav Suryavanshi Crying Video Viral IPL 2026 : गुवाहाटीच्या मैदानावर मंगळवारी रात्री आयपीएल २०२६ मधील एक अतिशय भावूक क्षण पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सच्या (RR) १५ वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने तर जिंकलीच, पण तो बाद झाल्यानंतर मैदानात जे घडले, त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या १३ व्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर रात्री उशिरा खेळाला सुरुवात झाली. प्रेक्षक केवळ एकाच कारणासाठी थांबले होते आणि ते म्हणजे वैभव सूर्यवंशीची फलंदाजी. वैभवनेही चाहत्यांना निराश केले नाही. दुसऱ्या षटकात जगातील नंबर १ गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करताना वैभवने पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. बुमराहसारख्या दिग्गज गोलंदाजाला त्याने ज्या निडरतेने खेळले, ते पाहून खुद्द बुमराही चकित झाला.
शार्दुलने रोखलं वादळ अन् वैभव कोलमडला –
ये सच में बच्चा है
पहले सामने वाले बॉलर को छक्के और छक्के मारकर रुलाता हे फिर आउट होने पर खुद रोता
हाथी घोड़े पालकी खेलने की उम्र में वर्ल्ड बेस्ट
बॉलर के जज्बात से खेलता हैबच्चा है दो बार बैटिंग तो देनी चाहिए 😅 pic.twitter.com/9ql7MZYCvk
— Rakesh 2.0 🇮🇳 (@TheRakesh_IND) April 8, 2026
वैभवने अवघ्या १४ चेंडूंत ३९ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात ५ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. मात्र, शार्दुल ठाकूरने त्याला बाद करताच राजस्थानच्या या युवा फलंदाजाचा स्वतःवरील ताबा सुटला. वैभव जेव्हा पवेलियनकडे परतत होता, तेव्हा तो आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसताना कॅमेऱ्यात कैद झाला.
निराशेत बॅट जमिनीवर आदळली –
मैदानातून बाहेर पडतानाचा वैभवचा एक ‘इनसाईड व्हिडीओ’ आता समोर आला आहे. यामध्ये तो रडताना आणि निराशेच्या भरात आपली बॅट जमिनीवर आपटताना दिसत आहे. मोठी खेळी खेळण्याची संधी हुकल्याने वैभव प्रचंड दुखावला होता. १५ वर्षांच्या मुलाची खेळाप्रती असलेली ही जिद्द आणि भूक पाहून क्रिकेट फॅन्स भावूक झाले आहेत. “हा मुलगा भारताचं भविष्य आहे,” अशा कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.





