Vaibhav Sooryavanshi Video : मैदानात धक्काबुक्की अन् बाहेर येताच धरले पाय! वैभव सूर्यवंशीच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं, पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Video : सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर मैदानात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली होती.

Vaibhav Sooryavanshi Touches Anura Tennekoon Feet Video Viral : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत १५ जून रोजी भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील सामना अत्यंत वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर मैदानात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली होती. (Vaibhav Sooryavanshi Video)
या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेला भारताचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi ) प्रचंड संतापात होता. मात्र, या राड्यानंतर काही वेळातच वैभवने मैदानाबाहेर असे काही केले, ज्याने केवळ श्रीलंकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचा हा नवा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. (Vaibhav Sooryavanshi Video)
मैदानात राडा, पण बाहेर भारतीय संस्कृतीचे दर्शन – (Vaibhav Sooryavanshi Video)
Vaibhav got into a heated argument with Sri Lankan players after the super over pic.twitter.com/wnGyEF6Nvw
— Abhi (@AbhiMSD_07) June 15, 2026
सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्याने वैभव सूर्यवंशी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकेच्या एका खेळाडूने त्याला डिवचले होते, ज्यावरून त्यांच्यात भर मैदानात धक्काबुक्की झाली. परंतु, या राड्यानंतर काही वेळातच दांबुलाच्या मैदानावर वैभवची भेट श्रीलंकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनुरा तेन्नेकून यांच्याशी झाली. संताप विसरून वैभवने तात्काळ पुढे जात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले आणि तो थेट तेन्नेकून यांच्या पाया पडला. ७९ वर्षांच्या या महान खेळाडूनेही वैभवच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याला आशीर्वाद दिला आणि भविष्यासाठी एक मोलाचा सल्लाही दिला. (Vaibhav Sooryavanshi Video)
कोण आहेत अनुरा तेन्नेकून? (Vaibhav Sooryavanshi Video)
Who Provoked Vaibhav Sooryavanshi after the game ? Was he completely at Fault ?@rohitjuglan @IDFCFIRSTBank #VaibhavSooryavanshi pic.twitter.com/a77zDy3IMP
— RevSportz Global (@RevSportzGlobal) June 15, 2026
अनुरा तेन्नेकून हे श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील अत्यंत आदरणीय आणि मोठे नाव आहे. १९७५ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी श्रीलंका संघाचे नेतृत्व केले होते. ते श्रीलंकेचे पहिले एकदिवसीय कर्णधार आहेत. या रोमांचक सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये वैभवने १४ चेंडूंत १ षटकार आणि ३ चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले होते. श्रीलंकेनेही ठीक २६५ धावा केल्याने सामना टाय झाला होता, ज्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (Vaibhav Sooryavanshi Video)





