Vaibhav Fight Truth : श्रीलंकन खेळाडूच्या ‘या’ दोन शब्दांमुळे भडकला वैभव सूर्यवंशी; मैदानावरील राड्याचं खरं कारण आलं समोर
Vaibhav Fight Truth : भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी हा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूवर का धावून गेला? याचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे.

Vaibhav Sooryavanshi Fight Truth Vishen Halambage Sledging Words Reveal : भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील सुपर ओव्हर सामन्यादरम्यान झालेल्या भयंकर राड्याने सध्या क्रिकेट जगताला हादरवून सोडले आहे. या वादाचा केंद्रबिंदू असलेला भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी हा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूवर का धावून गेला? याचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे. क्रिकबझच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या एका खेळाडूने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे हा संपूर्ण वाद पेटला होता.
…अन् ‘त्या’ दोन शब्दांमुळे वैभवने संयम गमावला!
खराब प्रकाशामुळे पंचांचा नकार असतानाही कर्णधार तिलक वर्माच्या आग्रहाखातर हा सुपर ओव्हर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या १७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ ९ धावाच करू शकला. भारताचा पराभव झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी कमालीच्या निराशेत पॅव्हेलियनकडे परतत होता.
याच वेळी श्रीलंकेचा फिल्डर विशेन हालामबेगे याने वैभवच्या अगदी जवळ जात अत्यंत टोमणेखोर भाषेत स्लेजिंग केली. हलमबागेने वैभवला डिवचत म्हटले, “सामना संपलाय, आता गुपचूप घरी जा…”. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवला हा अपमान सहन झाला नाही. यानंतर त्याने मागचा पुढचा विचार न करता मागे वळून थेट श्रीलंकेच्या खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर देत त्याला धक्का दिला.
Vaibhav got into a heated argument with Sri Lankan players after the super over pic.twitter.com/wnGyEF6Nvw
— Abhi (@AbhiMSD_07) June 15, 2026
डिकवेलाची मध्यस्थी; श्रीलंकेचा संघ मागणार माफी?
Oh noo.. Wait for the ugly fight by Vaibhav Sooriyavanshi.. That’s too much for a 15 year old. ( If its true ) #SLAVINDA pic.twitter.com/zUS3FviHSr
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) June 15, 2026
मैदानावरील हा राडा पाहून श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटपटू निरोशन डिकवेला आणि इतर वरिष्ठ खेळाडूंनी तात्काळ धाव घेत वैभव आणि विशेन या दोघांना एकमेकांपासून दूर केले. जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‘अ’ संघाच्या सामन्यांवर थेट लक्ष ठेवत नसली, तरी या बेशिस्तीबद्दल दोन्ही खेळाडूंवर स्थानिक बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या वादामुळे श्रीलंका ‘अ’ संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही मोठी खळबळ उडाली आहे. या अप्रिय घटनेसाठी श्रीलंका संघाने अधिकृतपणे भारतीय संघाची माफी मागावी, असा सूर तिथल्या वरिष्ठ खेळाडूंनी आळवला आहे. तसेच, अत्यंत खराब प्रकाशात सुपर ओव्हर खेळवण्यास परवानगी देणाऱ्या पंचांची भूमिकाही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.





