Vaibhav Sooryavanshi Reveals : ५२ चेंडूंत द्विशतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा मोठा खुलासा! युवराज सिंगच्या ‘त्या’ एका सल्ल्याने साकारली वादळी खेळी
Vaibhav Sooryavanshi Reveals : वैभव सूर्यवंशीने आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये युएईविरुद्ध शानदार खेळी करत अनेक विक्रम प्रस्थापित केले. सामन्यापूर्वी त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्याशी संवाद साधला होता.

Vaibhav Sooryavanshi reveals advice from idol Yuvraj Singh : अवघ्या ५२ चेंडूंत द्विशतक झळकावून विश्वविक्रम रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या या ऐतिहासिक खेळीचे श्रेय माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगला दिले आहे. युवराज यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांच्या सल्ल्यावर अमल केल्यानेच ही धडाकेबाज खेळी साकारता आल्याचे वैभवने सांगितले. यापूर्वी ३० चेंडूंत शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्मानेही युवराजच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाल्याचे स्पष्ट केले होते. वैभव युवराज यांना आपला आदर्श मानतो.
द्विशतकापूर्वी वैभवने साधला चार खास व्यक्तींशी संवाद –
या विक्रमी खेळीपूर्वी आपण केवळ चारच व्यक्तींशी बोललो होतो, असा खुलासा वैभवने केला आहे. यामध्ये त्याचे वडील, प्रशिक्षक मनीष ओझा, मित्र प्रथम आणि युवराज सिंग यांचा समावेश होता. यातील सर्वात प्रदीर्घ चर्चा युवराज यांच्यासोबत झाली. वैभवने आपल्या फलंदाजीतील अडचणी युवराजसमोर मोकळेपणाने मांडल्या, ज्यावर युवराजने त्याला खेळाचे तांत्रिक पैलू अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
सुरुवातीच्या दोन चेंडूंवर बदलला आपला नैसर्गिक अंदाज –
🏏 Vaibhav Sooryavanshi reveals how his idol Yuvraj Singh helped him overcome a difficult phase! ❤️🔥
.
.
.
#VaibhavSooryavanshi #YuvrajSingh #IndianCricket #TeamIndia #CricketNews #CricketUpdates #CricketInspiration #YoungCricketers #FutureOfIndianCricket #CricketLegends https://t.co/86RZnOzB2Y— cricketfastliveline (@cfll_official) November 25, 2026
पहिल्याच चेंडूपासून षटकार ठोकण्याच्या आक्रमक शैलीसाठी वैभव सूर्यवंशी जगभरात ओळखला जातो. मात्र, यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिला चेंडू सोडून दिल्याने आणि दुसऱ्या चेंडूवर केवळ बचावात्मक फटका खेळल्याने सर्वजण थक्क झाले. सुरुवातीचे दोन चेंडू खेळून खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्याचे लक्षात येताच, वैभवने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ सुरू केला आणि पॉवरप्लेमध्येच भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
युवराज सिंगच्या ‘त्या’ एका सल्ल्याने रचला इतिहास –
𝗦𝗣𝗘𝗖𝗜𝗔𝗟: It was a 30-minute phone call with his idol Yuvraj Singh that unshackled Vaibhav Sooryavanshi 🙌
He then created history with a world record 52-ball 204. The teenage sensation takes us inside his unbelievable knock and reveals how the moment unfolded 👏 – By @Moulinparikh
🎥 🔽 Don’t miss this one!
#TeamIndia | #RisingStarsAsiaCup
https://t.co/n3wLiiQkOj
— BCCI (@BCCI) November 25, 2026
युवराजच्या सल्ल्याबाबत बोलताना वैभव म्हणाला, “युवराज पाजींनी मला सांगितले होते की, जर तू सुरुवातीला २० चेंडू खेळून काढलेस, तर ते तुझ्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे तू सामन्याच्या परिस्थितीनुसार स्वतःला चांगले जुळवून घेऊ शकशील, जे संघाच्या हिताचे असेल.” याच सल्ल्यानुसार खेळत चेंडू बॅटवर व्यवस्थित येत असल्याचे जाणवताच वैभवने तुफानी फटकेबाजी करत नवा इतिहास रचला.





