Vaibhav Sooryavanshi Fight : सुपर ओव्हरच्या थरारानंतर वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, भांडणाचा VIDEO व्हायरल
Vaibhav Sooryavanshi Fight : पराभवानंतर भारताचा अवघ्या १५ वर्षांचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूंवर प्रचंड भडकला.

Vaibhav Sooryavanshi Fight Video Viral After Super Over : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत १५ जून रोजी कमालीचा थरार पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका ‘अ’ संघातील हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि थेट सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. मात्र, या सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मैदानावर खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला. पराभवानंतर भारताचा अवघ्या १५ वर्षांचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूंवर प्रचंड भडकला. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंमध्ये भर मैदानात झालेल्या धक्काधक्कीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमका कशावरुन झाला वाद?
हा सर्व प्रकार सुपर ओव्हर संपल्यानंतर घडला. श्रीलंका ‘अ’ संघाने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत १६ धावा कुटल्या होत्या. १७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शेवटच्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीला धाव करता आली नाही आणि टीम इंडिया ही मॅच ७ धावांनी हरली. भारताचा पराभव होताच श्रीलंकेचा खेळाडू विशेन हालामबेगे याने बाद झालेल्या वैभव सूर्यवंशी आणि मैदानात उपस्थित सूर्यांश शेडगे यांच्या दिशेने काहीतरी आक्षेपार्ह शेरेबाजी केली.
😬pic.twitter.com/T4n7Ze22OU https://t.co/e5fwimKPe0
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) June 15, 2026
श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच १५ वर्षांचा वैभव प्रचंड संतापला. त्याने थेट पुढे जात श्रीलंकेच्या खेळाडूला जोरदार धक्का दिला, यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूनेही त्याला प्रत्युत्तर दिले. वाद विकोपाला जात असताना श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी धावत येत मध्यस्थी केली. मात्र, ड्रेसिंग रूमकडे परततानाही वैभव कमालीच्या संतापात हाताने इशारे करत त्यांना खडे बोल सुनावत होता.
Bsdk show the full videopic.twitter.com/VRe2jq312Z
— Jeeban Sahu | ଜୀବନ ସାହୁ (@JeebanSahu85) June 15, 2026
सामना झाला टाय, सुपर ओव्हरमध्ये भारताचा गेम!
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४९.२ षटकांत सर्वबाद २६५ धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशी या सामन्यात १४ चेंडूंत केवळ २१ धावा करू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही ५० षटकांत ठीक २६५ धावा केल्यामुळे सामना टाय (Tie) झाला. निकालासाठी खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या १६ धावांच्या बदल्यातभारतीय संघ केवळ ९ धावाच करू शकला.
या पराभवासह इंडिया ‘अ’ संघाचा हा या मालिकेतील सलग दुसरा पराभव ठरला आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ८ धावांनी हरवले होते, मात्र त्यानंतर अफगाणिस्तानने भारताला डीएलएस (DLS) नियमानुसार ४ धावांनी हरवले आणि आता श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये भारताला धूळ चारली.





