Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी बनला भारताचा नवा सिक्कर किंग! मुरली विजयचा मोडला १० वर्षांपूर्वीचा विक्रम
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकून आयपीएलच्या इतिहासात नव्या विक्रमांची नोंद केली आहे.

Vaibhav Sooryavanshi 12 sixes record IPL 2026 : सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल २०२६ च्या ३६ व्या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मोठा धमाका केला. त्यानेआपल्या फलंदाजीने केवळ हैदराबादच्या गोलंदाजांनाच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. वैभवने अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकून आयपीएलच्या इतिहासात नव्या विक्रमांची नोंद केली आहे. यासह वैभवने विक्रमांची रांग लावली.
वैभने सूर्यवंशीने षटकारांचा पाडला पाऊस –
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलमध्ये एकामागून एक विक्रम मोडीत काढत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात वैभवने ३७ चेंडूंत १०३ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे, त्याने चौकारांपेक्षा षटकारांवर जास्त भर दिला. त्याने आपल्या डावात केवळ ५ चौकार मारले, पण तब्बल १२ षटकार खेचून ७२ धावा केवळ षटकारांच्या जोरावर वसूल केल्या. त्याने हे शतक २७८.३७ च्या विस्मयकारक स्ट्राईक रेटने पूर्ण केले.
Records under threat every time he bats 🔥
Vaibhav Sooryavanshi hits a 36-ball century, third-fastest in #TATAIPL history. #TATAIPL 2026 | #RRvSRH | LIVE NOW 👉https://t.co/HHSiOA288w pic.twitter.com/NggaHKljUS
— Star Sports (@StarSportsIndia) April 25, 2026
मुरली विजयचा ११ वर्षांचा विक्रम मोडला –
एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा भारतीयाचा विक्रम आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. याआधी २०१० मध्ये मुरली विजयने ११ षटकार मारण्याचा विक्रम केला होता. वैभवने या सामन्यात १२ षटकार मारून मुरली विजयचा हा विक्रम इतिहासजमा केला आहे. १५ व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला असून, त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi Record : वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचा धमाका! ३६ चेंडूत ठोकले शतक; सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला
दोन वेळा ‘वेगवान’ शतकाचा पराक्रम –
आयपीएलच्या इतिहासात ३६ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोनदा शतके झळकावणारा वैभव सूर्यवंशी हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. गेल्या वर्षी (२०२५) त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते, तर यंदा ३६ चेंडूत हा पराक्रम केला आहे. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम अजूनही ख्रिस गेलच्या (३० चेंडू) नावावर असला, तरी भारतीय खेळाडूंमध्ये वैभव अव्वल स्थानी आहे.





