Vaibhav Sooryavanshi Value : अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी दिवसाला कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी; ब्रँड व्हॅल्यूमध्ये सचिन तेंडुलकरला देतोय टक्कर
Vaibhav Sooryavanshi Value : यापूर्वी १५ वर्षांच्या खेळाडूसाठी असा कोणताही मापदंड नव्हता. वैभवचा सध्याचा व्यावसायिक रेट कार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षे घालवलेल्या खेळाडूंच्या बरोबरीचा आहे

Vaibhav Sooryavanshi Brand Value Crosses 1.5 Crore Per Day IPL 2026 Valuation Study : अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) क्रिकेटच्या मैदानातून थेट कॉर्पोरेट जगतालाही थक्क केले आहे. आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ आणि ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा पुरस्कार पटकावल्यानंतर वैभवची ब्रँड व्हॅल्यू गगनाला भिडली आहे. सध्या तो जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून दररोज तब्बल १.५ ते २ कोटी रुपयांची कमाई करत आहे. ‘हौलिहान लोके’च्या (Houlihan Lokey) आयपीएल व्हॅल्युएशन स्टडीनुसार, टीव्ही प्रसारणादरम्यान वैभवची लोकप्रियता थेट महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या तोडीस तोड असल्याचे समोर आले आहे.
१० वर्षांचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत; दररोज १.५ कोटींची फी!
एएमपी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे सीईओ इंद्रनील दास ब्लाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी १५ वर्षांच्या खेळाडूसाठी असा कोणताही मापदंड नव्हता. वैभवचा सध्याचा व्यावसायिक रेट कार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षे घालवलेल्या खेळाडूंच्या बरोबरीचा आहे. वर्षाच्या सुरुवातीला अंडर-१९ विश्वचषक फायनलमधील त्याची १७५ धावांची वादळी खेळी, त्यानंतर आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यात त्याच्या नावावर लागलेली तिकिटांची रांग यामुळे कंपन्यांनी त्याच्यावर कोट्यवधींच्या बोली लावल्या आहेत.
दोन वर्षांत कमाई होणार दुप्पट; दिग्गजांच्या पंक्तीत बसणार वैभव!
🚨 JUST IN: Vaibhav Sooryavanshi, just 15, currently commands ₹1.5–2 crore per day for brand shoots and appearances. 💰 @htTweets pic.twitter.com/EXI3DJkdjO
— TheWicketReport (@WicketReport) September 14, 2026
तज्ज्ञांच्या मते, सध्या शुबमन गिल, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांसारख्या अव्वल खेळाडूंच्या ब्रँड लीगमध्ये वैभवने स्थान मिळवले आहे. जर पुढील दोन वर्षे त्याने मैदानावरील हाच झंझावाती फॉर्म कायम राखला, तर त्याची प्रतिदिवस कमाई ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे तो देशातील सर्वात महागड्या सेलिब्रिटींच्या पटीत जाऊन बसेल. सध्या ब्रँड्स त्याच्या कारकिर्दीपेक्षा त्याच्या सध्याच्या अफाट लोकप्रियतेवर आणि क्षमतेवर मोठा आर्थिक जुगार लावत आहेत.
कोणताही औपचारिक एजंट नाही; कुटुंब आणि राजस्थान रॉयल्सची भक्कम पाठराखण!
दररोज दीड कोटीहून अधिक आकारणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे सध्या कोणताही अधिकृत मॅनेजर किंवा कॉर्पोरेट एजंट नाही. त्याचे कुटुंबीय त्याचे व्यावसायिक व्यवहार हाताळत आहेत; तर सर्वात महत्त्वाची भूमिका राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) सपोर्ट सिस्टीमची आहे. या फ्रँचायझीने वैभवला शोधून स्टार बनवले असून ते त्याला अनावश्यक प्रसिद्धी आणि दबावापासून जपण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत आहेत. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत पालकांची सावध भूमिका त्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे





