#PKLSeason10 (#MUMvPUN Match 86) : पुणेरी पलटणचं वर्चस्व कायम; यु मुम्बाविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत…

U Mumba vs Puneri Paltan, Pro Kabaddi League 2023-24 (Hyderabad) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या यु मुम्बा व पुणेरी पलटण यांच्यातील रोमहर्षक सामन्यात ३२-३२ अशी बरोबरी झाली. मात्र, गुणतालिकेत पुणे संघाने आपले वर्चस्व कायम राखत मुम्बा संघाला पहिल्या पाच संघात स्थान मिळवण्यापासून रोखले. या सामन्यानंतर पुणेरी पलटणने दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत केले.
यू मुम्बा 🆚 पुणेरी पलटन 🟰 टाई 🤝
दर्शकों को देखने को मिला सीज़न 10 का छठा टाई मुकाबला ⚔
आज के मैच में किस खिलाड़ी ने आपको सबसे ज़्यादा प्रभावित किया❓#ProKabaddi #ProKabaddiLeague #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #MUMvPUN #UMumba #PuneriPaltan pic.twitter.com/MoZmfFmu3s
— ProKabaddi (@ProKabaddi) January 23, 2024
पहिले सत्र सुरु झाल्यावर खरेतर पुणेरी पलटणने आघाडी घेतली होती. मात्र, यु मुम्बाने अचानक आक्रमक खेळ करत ही आघाडी मिटवली. तसेच त्यानंतर त्यांच्या गुमान सिंगने ८ तर गोकुलाकाननने ४ गुण मिळवताना संघाला निसटती २ गुणांची आघाडी प्राप्त करुन दिली. पुणेरी संघाचा कर्णधार अस्लम इनामदारने ७ गुण मिळवले मात्र, पहिल्या सत्रात त्याला साथ देण्यात अन्य सहकारी खेळाडू कमी पडले. पुणेरी संघाने रेडचे ९ तर टॅकलचे ७ गुण प्राप्त केले होते. यु मुम्बाने रेडचे ११ तर टॅकलचे ६ गुण मिळवले व वर्चस्व राखले.
Here’s how the standings look like after the bragging rights were shared in the Maha-Derby ⚡#ProKabaddi #HarSaansMeinKabaddi #PKL #PKLSeason10 #ProKabaddiLeague #MUMvPUN pic.twitter.com/ScFncrupTZ
— ProKabaddi (@ProKabaddi) January 23, 2024
दुसरे सत्र सुरु झाल्यावर तर या दोन संघतील चुरस आणखी वाढली. एकवेळ २०-२०, २६-२६ तर २७-२७ अशीही बरोबरी झाली. दोन्ही संघांचे खेळाडू आक्रमण व टॅकलमध्ये कुठेही कमी पडत नव्हते त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. एकेका गुणासाठी रस्सीखेच सुरु होती.
२०-२० अशा बरोबरीनंतर दोन्ही संघाचे खेळाडू अत्यंत आक्रमकपणे खेळ करत होते. एक गुणाची आघाडी कोणी घेतली तर लगेचच ही पिछाडी समोरचा संघ भरुन काढत होता. मुम्बा संघाने रेड गुणांमध्ये वर्चस्व राखले तर पुणेरी संघाने टॅकल गुणांत बाजी मारली. मात्र, अखेर ही लढत ३२-३२ अशी अत्यंत रोमहर्षकरीत्या बरोबरीत सुटली.





