वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार : जगदीश मुळीक

पुणे – “वडगाव शेरी मतदारसंघाला सुनील टिंगरे यांच्या रुपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार आहेत. आम्ही या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले.
वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ धानोरी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात मुळीक यांच्यासह महायुतीच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाढवण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग खेसे, अर्जुन गरुड, अशोक खांदवे, मंगेश गोळे, सतीश कुसमाडे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, रुपाली ठोंबरे, अनिल टिंगरे, राहुल भंडारे, बाळासाहेब जानराव, भगवान जाधव, अशोक कांबळे, उषा कळमकर, ऐश्वर्या जाधव, सतीश म्हस्के, नवनाथ मोझे, संतोष खांदवे, शशिकांत टिंगरे, मोहनराव शिंदे सरकार, सुनील टिंगरे, अर्जुन जगताप, चंद्रकांत जंजिरे, गुलाब पठारे, विकास पठारे, रवींद्र गलांडे, सुधीर गलांडे, कुलदीप शर्मा, आनंद सरोदे, सचिन टिंगरे, विनायक टिंगरे, रवी टिंगरे, बंडू खांदवे, दीपक शिर्के, मिलिंद खांदवे, रवींद्र देवकर, साहेबराव धापटे, शामा जाधव, दत्ता भालेराव उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, “गेल्या दहा वर्षांतील विकास आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना असणारे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. महिला, शेतकरी, युवकांचे हित जोपासणारे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे.’
“विरोधक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष देऊ नये. महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले असून जगदीश मुळीक व मी दोघेही आमदार होणार आहोत.”
– सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस-महायुती उमेदवार





