Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ढगफुटी.! दोघांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता
Updated On:

Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी ढगफुटी झाली. मुसळधार पावसाच्या तडाख्याने दरड कोसळून २ बांधकाम मजूर मृत्युमुखी पडले. तर, ७ जण बेपत्ता झाले.
ती दुर्घटना यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली. दरड कोसळलेल्या ठिकाणी हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. संबंधित ठिकाणी २९ मजुरांसाठी राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
मजूर राहत असलेल्या ठिकाणीच पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात ९ मजूर वाहून गेले. त्यातील दोघांचे मृतदेह दुर्घटना स्थळापासून १८ किलोमीटर अंतरावर यमुना नदीच्या काठावर आढळले.
बेपत्ता मजुरांच्या शोधासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दलांची पथके आणि पोलीस सहभागी झाले. बांधकाम मजुरांपैकी अनेक जण मूळचे नेपाळचे रहिवासी असल्याचे समजते.





