UTT 2024 : मनिका बत्राची दमदार कामगिरी, पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्सचा पुणेरी पलटणवर शानदार विजय…

Ultimate Table Tennis 2024 (Puneri Paltan vs Bengaluru Smashers) : स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने अहिका मुखर्जीचा पराभव करत सोमवारी येथे झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस 2024 मध्ये तिच्या पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स संघाला पुणेरी पलटण विरुध्द 10-5 असा विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स संघाचा मोसमातील हा दुसरा विजय होता.
मनिकाने अहिकाविरूध्दचा पहिला गेम गमावला असला तरी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती मनिका हिने सलग गेम जिंकून सामना 2-1 असा जिंकला. पुणेरी पलटणच्या अंकुर भटाचार्जीने बेंगळुरूच्या जीत चंद्राचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर मनिकाने कर्णधार अल्वारो रॉबल्सच्या साथीने नतालिया बाजोर आणि अनिर्बन घोष यांचा 2-1 असा पराभव केला. तर रॉबल्सने दुहेरीत केलेल्या शानदार कामगिरीच्यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात दोन वेळचा ऑलिम्पियन जोआओ मोंटेइरोवर 2-1 असा विजय मिळवला.
2⃣/2⃣ Wins ✅@Bengalurupbg are off to a smashing start 🔝💛
📲 Watch IndianOil #UTT2024 live on JioCinema and Sports18 Khel in India and on Facebook Live outside India https://t.co/0VZVcnqLjchttps://t.co/8yzOnVPMG9
Tickets available on https://t.co/or5ruqsmLk… pic.twitter.com/1sjEJFa59J
— Ultimate Table Tennis (@UltTableTennis) August 26, 2024
दरम्यान, पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्सला सामना जिंकण्यासाठी फक्त एका गुणाची गरज होती आणि अमेरिकेच्या लिली झांगने पुणेरी पलटणच्या यशिनी शिवशंकरचा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
US Open 2024 : भारताच्या सुमित नागलचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात….
पुणेरी पलटण (05) विरूध्द पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स (10)
अंकुर भटाचार्जी 2 – 1 जीत चंद्र [11-6, 5-11, 11-7]
अहिका मुखर्जी 1-2 मनिका बत्रा [11-8, 5-11, 6-11]
नतालिया/अनिर्बन 1-2 मनिका/अल्वारो [6-11, 11-8, 10-11]
जोआओ मोंटेरो 1-2 अल्वारो रोबल्स [5-11, 11-10, 8-11]
यशिनी एस 0-3 लिली झांग [9-11, 9-11, 5-11]





