#corona effect- मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता उस्मानाबादही बंद

उस्मानाबाद- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील सर्व नगरपंंचायत क्षेत्रातील व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात येत आहे. तसेच चित्रपटगृह नाट्यगृह, जीम बंद करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी जावू नये, कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करु नये, असं आवाहन उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनतेला केलं आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व नियमांचं उल्लंघन करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्हातील सगळे घार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच यात्राही रद्द केली केली आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर गेली आहे तर मुंबईत कोरोनामुळे पहिला मृत्यु झाला आहे. त्यामुळे या उपाययोजनेचं पालन करणं आवश्यक आहे





