T20 World Cup 2024 (Super-8) : अमेरिकेने द. आफ्रिकेविरुद्ध Toss जिंकला; कर्णधार आरोन जोन्सनं घेतला ‘हा’ निर्णय…

T20 World Cup 2024 (Super-8, USA vs SA) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा सामना ग्रुप-2 मध्ये दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. अमेरिकेने साखळी फेरीत पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाला पराभूत करत चकित केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही.
सुपर-8 फेरी सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोनांक पटेल पुन्हा एकदा सामना खेळत नाही. तो दुखापतग्रस्त झाला आहे. (USA have won the toss and elected to bowl first against South Africa in Antigua) अमेरिकेने अतिरिक्त फिरकीपटू खेळवला आहे. केन्झिगे प्लेइंग-11 मध्ये परतला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनेही अतिरिक्त फिरकीपटूला प्राधान्य दिले आहे. ओटनील बार्टमनच्या जागी केशव महाराज यांना संधी देण्यात आली आहे.
The Super Eight stage is underway 🤩
USA have won the toss and elected to bowl first against South Africa in Antigua.#T20WorldCup | #USAvSA | 📝: https://t.co/4DsfDsB5sW pic.twitter.com/zfFuQBOcLY
— ICC (@ICC) June 19, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
यूएसए : शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉस्तुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावलकर.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.
IND vs SA 2nd ODI : स्मृती मंधानाचा तडाखा, सलग दुसऱ्या शतकासह केली अनेक विक्रमांची नोंद…
यापूर्वी अँटिग्वा येथे झालेल्या टी-20 मध्ये कर्णधारांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नऊ वेळा घेतला आहे, तर या सामन्यात एकूण पाच वेळा पाठलाग करण्याचा विचार केला आहे. अँटिग्वामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला एकदाच विजय मिळवता आला आहे. त्याचवेळी पाठलाग करताना संघांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. आज दोन्ही संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने आले आहेत.





