US winter Storm : अमेरिकेतल्या हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 वर

वॉशिंग्टन – अमेरिकेत आलेल्या प्रचंड हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 झाली आहे. बफेलो शहर तसंच एरी काऊंटी मध्ये किमान 34 जण मृत झाल्याची माहिती काउंटीचे अधिकारी मार्क पोलोनकार्झ यांनी दिली.
आज बुधवारी देखील अमेरिकेतील हजारो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. साउथवेस्ट एअरलाइन्सला आणखी हजारो उड्डाणे रद्द करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे शिकागो विमानतळावर सेकडो प्रवासी अडकून पडले होते.
न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक 37 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतातील बफेलो शहरातील खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरळी करण्यात आज प्रशासनाला यश आले. वीज प्रवाह खंडीत झाल्यामुळे हे संपूर्ण शहर गेल्या 24 तासांपासून कडाक्याच्या थंडीत कुडकुडत होते.
अमेरिकेचे अध्ययक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. येत्या रविवार पर्यंत या हिमवादळाचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या पश्चिम आणि दक्षिण प्रदेशात आज मुसळधार पाऊस आणि बर्फाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.





