अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स जाणार भारत भेटीवर

न्यूयॉर्क : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स या महिन्याच्या अखेरीस भारतभेटीवर जाणार आहेत. त्यांच्या समवेत सेकंड लेडी उषा वान्स या देखील भारत भेटीवर जाणार आहेत, असे अमेरिकेतल्या माध्यमांनी तीन वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. वान्स अमेरिकेचे उपाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा दुसरा विदेश दौरा असणार आहे.
गेल्या महिन्यात आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यात ते पहिल्यांदा फ्रान्स आणि जर्मनीला गेले होते. तेथील नेत्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केल्यानंतर आता त्यांनी आपल्या दुसऱ्या दौऱ्यात भारताला भेट देण्याचे नियोजन केले आहे. जे.डी. वान्स यांच्या पत्नी उषा वान्स यांचे पालक क्रिष चिलुकुरी आणि लक्ष्मी चिलुकुरी हे १९७० च्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते.
तेंव्हापासून त्या अमेरिकेतच वास्तव्यास आहेत. येल लॉ स्कूलमध्ये उषा आणि जे.डी.वान्स यांची भेट झाली होती. तेंव्हा उषा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी लेखनिकाचे काम करत होत्या. उषा यांनी येल युनिव्हर्सिटीमधून पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे. जे.डी वान्स यांच्या समवेत सेकंड लेडी म्हणून भारत भेटीवर येणाऱ्या उषा वान्स या प्रथमच आपल्या मूळ देशाला भेट देणार आहेत.





