US Iran peace talks: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा आज पाकिस्तानात होणार आहे. दरम्यान, चर्चेच्या काही तास आधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी, “इराणकडे दुसरा पर्याय नाही आणि ते केवळ वाटाघाटी करण्यासाठीच जिवंत आहेत.” असे म्हणत पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्यांनी थेट होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भातही एक महत्त्वपूर्ण विधान केले. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत, “इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर नियंत्रण ठेवून जगाकडून खंडणी वसूल करत आहे.”असे US Iran peace talks अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “इराणी लोकांना कदाचित हे कळत नाही की आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगाला घाबरवण्याशिवाय त्यांच्याकडे खेळण्यासाठी दुसरा कोणताही पत्ता नाही. जर ते आज जिवंत असतील, तर ते केवळ वाटाघाटी करण्यासाठीच आहेत.” US Iran peace talks: अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स शांतता चर्चेसाठी आपल्या टीमसह इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी संकेत दिला की, जर ही चर्चा अयशस्वी झाली, तर इराणवरील हल्ले पुन्हा सुरू होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या युद्धनौका अत्याधुनिक दारुगोळ्याने सुसज्ज असून हल्ल्यांसाठी सज्ज आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, “इराण सहमत असो वा नसो, वॉशिंग्टन लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करेल” असा दावा केला आहे. पुढे ते म्हणाले, “हे सोपे नसेल. मी फक्त एवढंच सांगेन की आम्ही ती लवकरच खुली करू.” इराणबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, “आपण अशा लोकांशी व्यवहार करत आहोत, जे खरं बोलत आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही. ते आम्हाला सांगतात की ते अण्वस्त्रे नष्ट करत आहेत आणि मग प्रसारमाध्यमांकडे जाऊन सांगतात की त्यांना युरेनियमचे संवर्धन करायचे आहे.” ट्रम्प यांच्या मते, इराणी लोक लढण्यापेक्षा खोट्या बातम्या तयार करण्यात आणि जनसंपर्क सांभाळण्यात अधिक पटाईत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेत पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इराणी आणि अमेरिकन अधिकारी आज इस्लामाबादमध्ये आपापली भूमिका मांडण्यासाठी भेटतील. US Iran peace talks: