अमेरिकन ट्रेड डील टीमचा भारत दौरा रद्द, अमेरिका-भारताचा व्यापार करार पुन्हा अडचणीत
India US Trade Deal | भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करार टॅरिफ आणि धोरणात्मक मतभेदांमुळे थांबला आहे. पुढील आठवड्यात अमेरिका आणि भारताच्या अधिकाऱ्यांमध्ये नवी दिल्लीत व्यापारी करारासंदर्भात बैठक होणार होती. मात्र आता वॉशिंग्टन डीसीच्या अधिकाऱ्यांचा भारत दौरा अमेरिकेने थांबवला आहे.
द्विपक्षीय व्यापार करारावरील अनिश्चितता वाढली
माध्यमांच्या अहवालानुसार, अमेरिकन प्रतिनिधीमंडळाने आपला दौरा रद्द केला आहे, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार करार वर अनिश्चितता वाढली आहे. याचे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. हा जागतिक स्तरावर कोणत्याही देशांपेक्षा हा सर्वाधिक टॅरिफ आहे. २५ टक्के टॅरिफ आधीच अमलात आलेले आहे. तर रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे अतिरिक्त २५ टक्के आणखी टॅरिफ लावला जाणार आहे. India US Trade Deal |
ट्रम्प यांनी लादला अतिरिक्त टॅरिफ
या टीमला दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्यासाठी काम करायचे होते, जे सध्या महत्त्वाचे आहे. ही चर्चा अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या फेरीची चर्चा होती. जी 27 ऑगस्टच्या आसपास होणार होती, जेव्हा अतिरिक्त 25% टॅरिफ लागू होणार होता. India US Trade Deal |
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात 25-29 ऑगस्टपर्यंत व्यापार करारावर चर्चा होणार होती. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की अमेरिकेचं शिष्टमंडळ व्यापार करारासंदर्भातील पुढील बैठकीसाठी येणार नाही. मात्र या चर्चेचे वेळापत्रक पुन्हा निश्चित केले जाण्याची पूर्ण शक्यता असल्याचे देखील म्हंटले जात आहे. India US Trade Deal |
वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी तडजोड करणार नाही – पंतप्रधान मोदी
दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, त्यांना मोठी वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी ते तडजोड करणार नाहीत. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलास्का येथे १५ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. रशिया-युक्रेन युद्धबंदी बाबत या चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे भारतावर लादलेले टॅरिफ कमी होण्याची अनिश्चितता कायम आहे. India US Trade Deal |
हेही वाचा :
‘आता वय झालं रिटायरमेंट घे!’; नेटकऱ्याने खिल्ली उडवताच शाहरुखने दिले सडेतोड उत्तर





