US-Pakistan Agreement। भारताला धक्का देत अमेरिकेची पाकशी हातमिळवणी ; मोठा करार करत ट्रम्प म्हणाले,”भविष्यात पाकिस्तान भारताला…”

US-Pakistan Agreement। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सोशल मीडियाद्वारे दोन्ही देशातील कराराविषयी माहिती दिली. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत “अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे” अशी माहिती दिली. या अंतर्गत दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील. ट्रम्प यांनी या करारातून भारताला पूर्णपणे डावलले असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी दक्षिण कोरियाबद्दलही एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “आम्ही पाकिस्तानशी एक करार केला आहे, ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या प्रचंड तेल साठ्यांच्या विकासावर एकत्र काम करतील. आम्ही एक तेल कंपनी निवडत आहोत जी या भागीदारीचे नेतृत्व करेल. कोणाला माहित आहे, कदाचित पाकिस्तान कधीतरी भारताला तेल विकेल!” असे म्हणत भारतालाही चिमटा काढला आहे.
ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाबद्दल काय म्हटले ? US-Pakistan Agreement।
दक्षिण कोरियाचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी, “आम्ही व्हाईट हाऊसमध्ये व्यापार करारावर काम करण्यात खूप व्यस्त आहोत. मी अनेक देशांच्या नेत्यांशी बोललो आहे आणि ते सर्व अमेरिकेला खूप आनंदी करू इच्छितात. मी आज दुपारी दक्षिण कोरियाच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाला भेटेन. दक्षिण कोरिया सध्या २५% कर आकारत आहे, परंतु त्यांच्याकडे हा कर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव काय आहे हे जाणून घेण्यास मला रस असेल.”असे म्हटले आहे.
….यामुळे अमेरिकेची व्यापार तूट कमी होणार US-Pakistan Agreement।
ट्रम्प म्हणाले की अनेक देश कर लावण्याचा प्रस्ताव देत आहेत, यामुळे अमेरिकेची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. ट्रम्प असेही म्हणाले की योग्य वेळी संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला जाईल. जर आपण भारताबद्दल बोललो तर अमेरिकेसोबत व्यापार कराराबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. हे देखील लवकरच अंतिम केले जाऊ शकते. ट्रम्प म्हणाले की भारत आणि अमेरिकेतील व्यापार संतुलित नाही. ते म्हणतात की भारत अमेरिकेसोबत कमी व्यापार करतो.





